नाशिक | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नाशिकमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंचांसह गावकरीही उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान बोलताना अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.
अजित पवारांनी उपसरपंचांच्या पेहारावावरूनही टोलेबाजी केली. राजेंद्र आज असा नटलाय की लग्नात सुद्धा इतका नटला नव्हता, असं अजित पवार म्हणताच उपस्थित हसून हसून लोटपोट झाले.
अजित पवारांनी आधी दिंडोरीतील कादवा इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन केलं. त्यानंतर त्यांनी वरखेडा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाला हजेरी लावली. यावेळी अजित पवारांनी फडणवीसांसोबत घेतलेल्या शपथेची देखील आठवण करून दिली.
दरम्यान, आघाडीचं सरकार आहे, अरे काय पाहिजे ते सांगा मी द्यायलाच बसलोय असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

