अखेर 'तान्हाजी'ने पार केला कमाईचा सुवर्ण आकडा....

0 झुंजार झेप न्युज

नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणारा अजय देवगणचा 'तान्हाजी ः द अनसंग कॉरियर' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा तुफान गाजतोय. त्यासोबतच देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. 'तान्हाजी' सिनेमाने अवघ्या सहा दिवसांत 107 कोटींचा गल्ला जमकला आहे. 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळकणारा 'तान्हाजी' या वर्षातील पहिला सिनेमा ठरला आहे.
ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी' हा सिनेमा देशभरात 4540 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. 'तान्हाजी'ने पहिल्या दिवशी 15.10 कोटी, शनिकारी 20.57 कोटी, रकिकारी 26.26 कोटी, सोमकारी 13.75, मंगळकारी 15.28 कोटी रुपये आणि बुधकारी 16.72 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 150 कोटींचा आकडा लवकरच पार करेल असा विश्वास सिनेतज्ञांनी व्यक्त केला आहे.
गंभीर विषय, कमी स्क्रीन तरीही…दीपिकाचा 'छपाक' यशस्वी
'तान्हाजी'सोबत दीपिका पदुकोणचा 'छपाक' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 'छपाक'ने सहा दिवसांत 26.31 कोटींचा व्यवसाय केला आहे. ऑसिडहल्लापीडित लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर हा सिनेमा आहे. गंभीर सामाजिक विषय असलेला सिनेमा जेवढी कमाई करेल तेवढी कमाई 'छपाक' करीत आहे. 'छपाक' सिनेमा तयार करण्यासाठी 35 कोटींचा खर्च आला. 'तान्हाजी'ला देशभरात 4540 स्क्रीन्स मिळाले आहेत, तर 'छपाक' 1700 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

is 💯 NOT OUT... Day 6 is higher than Day 1, 4 and 5... Terrific trending on weekdays indicates the power of solid content... Speeding towards ₹ 150 cr... Fri 15.10 cr, Sat 20.57 cr, Sun 26.26 cr, Mon 13.75 cr, Tue 15.28 cr, Wed 16.72 cr. Total: ₹ 107.68 cr. biz
3,303 people are talking about this

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.