मुंबई : इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने वर्षाच्या सुरूवातीलाच मोठी कामगिरी केली आहे. इस्रोने आणखी एक यशस्वी कामगिरी करत जीसॅट-30 (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून यशस्वी प्रेक्षेपण केले आहे. आज पहाटे दोन वाजून 35 मिनिटांनी उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षेपण केले. GSAT-30 या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात नवी क्रांत्री होणार आहे. या उपग्रहामुळे इंटरनेट अधिक गतीने चालणार आहे.
Indian Space Research Organisation: India’s telecommunication satellite GSAT-30 was successfully launched into a Geosynchronous Transfer Orbit (GTO) from Kourou launch base in French Guiana by Ariane-5 VA-251, today. (Image Courtesy: Arianespace)
107 people are talking about this
दरम्यान, GSAT-30 या उपग्रहाचे वजन सुमारे 3,100 किलो आहे. लॉंचिंगपासून 15 वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे.
यापूर्वी 2015 मध्ये इनसॅट-4 ए हा उपग्रह लॉंच करण्यात आला होता. त्याची मर्यादा संपुष्टात आली असून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे GSAT-30 हा दुरसंचार उपग्रह इस्रोने लॉन्च केला आहे. जीसॅट-30 हा उपग्रह इनसॅट-4 एच्या जागी काम करणार आहे.
दरम्यान, GSAT-30 हा दुरसंचार उपग्रहामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचे भाकितही वर्तवण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.


