निरमा पावडरच्या 'या' जाहिरातीमुळे अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात : संतप्त शिवप्रेमींनी केली माफीची मागणी!

0 झुंजार झेप न्युज

अभिनेता अक्षय कुमार हा निरमा पावडरच्या एका जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अक्षय कुमारने निरमाची ही जाहिरात करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप आता त्याच्यावर होत आहे. अक्षय कुमार आणि इतर कलाकारांना निरमाच्या जाहिरातीत मावळ्यांच्या वेशात दाखवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा या जाहिरातीमधून अपमान करण्यात येत असून अभिनेता अक्षय कुमारने याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत.


अक्षय कुमार आणि इतर मावळे निरमा पावडरच्या या जाहिरातीत लढाई करुन दरबारात परतलेले असतात. त्यावेळी सुवासिनी त्यांचे औक्षण करतात. पण एक महिला त्यांचे युद्धात मळलेल्या, खराब झालेल्या कपड्यांवर भाष्य करते आणि हे कपडे तर आम्हालाच धुवावे लागतील असे म्हणते. अक्षय कुमार ज्यानंतर म्हणतो, महाराज की सेना दुश्मनोंको धोना जानती हैं और अपने कपडे भी! आणि त्यानंतर अक्षय कुमार आणि त्याच्यासह सगळे मावळे कपडे धुताना दाखवण्यात आले आहेत. पण हा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा असून या प्रकरणी अक्षय कुमारने माफी मागावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.