बेळगाव : कर्नाटक नवनिर्माण सेनेचा नंगानाच सुरुच; आता 'तान्हाजी'ला विरोध

0 झुंजार झेप न्युज

बेळगाव : काल देशभरात अजय देवगनचा 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपट प्रेक्षकांच्या पंसतीस उतरताना दिसत आहे. पण कर्नाटक नवनिर्माण सेनेने बेळगावातील ग्लोब चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या तान्हाजी चित्रपटाला विरोध दर्शविला आहे. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे पोस्टर खाली उतरवण्यास भाग पाडले. चित्रपटाचे पोस्टर्स खाली उतरवण्याची घटना काल दुपारी घडली आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी संध्याकाळी तानाजी चित्रपटाचे पोस्टर पुन्हा लावून फटाके फोडून मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर याने काही दिवसांपूर्वी एकीकरण समिती नेत्यांबद्दल बेताल वक्तव्य केले होते. त्यानंतर कोल्हापुरात शिवसेनेने कन्नड चित्रपट 'श्रीमन्ननारायण'चे प्रदर्शन बंद पाडले होते. शिवसेनेने कोल्हापुरात कन्नड चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडल्यामुळे कर्नाटकात आम्ही तानाजी चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याची भूमिका कर्नाटक नवनिर्माण सेनेने घेतली आहे.
तानाजी चित्रपटाला पोलीस संरक्षणात दाखल झालेल्या मूठभर कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविणाऱ्या घोषणा दिल्या. नंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस तेथून हटवले. एकीककरण समितीच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी ग्लोब थिएटरकडे जमून खाली उतरवलेले पोस्टर पुन्हा वर लावले. यावेळी युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि उपस्थितांना मिठाई वाटली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.