धुळे | राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. महाविकास आघाडीचा जिल्हा परिषद निवडणुकीत परिणाम झालेला दिसून आला नाही. धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र भाजपनं एकहाती विजय मिळवल्यानं धुळ्यात भाजपचाच धुरळा दिसून आला आहे.
धुळ्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनेते संग्राम पाटील हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले आहेत. यामुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला आहे.
सगळीकडेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं वातावरण असताना जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीचं मतदान घेण्यात आलं यात पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम यांच्या निवडणुका झाल्या आहेत
दरम्यान, महाविकास आघाडीच्या दृष्टीने जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल महत्वाचे ठरणार आहेत. यामुळं जिल्हा परिषद निवडणुकीत कुणाची चलती असेल?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

