भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी २० क्रिकेट सामना पुण्यात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ आज (बुधवारी) पुण्यात दाखल झाला आहे.
पुण्यातील लोहगाव विमानतळावर दुपारी एक च्या सुमारास भारतीय आणि श्रीलंकन संघातील खेळाडूंचे आगमन झाले. उद्या एक दिवस सराव करणार असून त्यानंतर १० तारखेला शुक्रवारी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा मिळवण्याचा भारतचा प्रयत्न असेल तर श्रीलंकेने हा सामना जिंकला तर मालिका १-१ अशी बरोबरीत सुटेल. त्यामुळे मालिकेचे भविष्य हे पुण्यातील सामन्यावर अवलंबून आहे.

