विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज सादर करताना देवेंद्र फडणवीस यांनी शपथपत्रात त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करत अॅड. सतीश उके याचिका यांनी दाखल केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा दिला आहे.मात्र हा दिलासा देतांना याप्रकरणी २४ जानेवारीला होणाऱ्या पुढील सुणावणीस फडणवीस यांना व्यक्तिष: न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
शनिवारी या याचिकेवर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली . या प्रकरणी न्यायालयाने फडणवीस यांना शनिवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
फडणवीस यांचे वकील उदय डबले यांनी न्यायालयाला सांगितले की राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार सुरु आहे तसेच विदर्भाला अवकाळी पावसाने झोडपून काढले असल्याने शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसोबत व्यस्त आहेत . त्यामुळे फडणवीस सुनावणीला हजर राहू शकत नाही . तर याचिकाकर्ते सतीश उके यांचे वकील अॅड. सुदीप जैस्वाल यांनी याबाबत न्यायालयात आक्षेप नोंदवला.

