मुंबईची 'श्रीपत भवन' चाळ ते चाळींचा विकास करणारे गृहनिर्माण मंत्रीपद! | झुंजार झेप न्युज

0 झुंजार झेप न्युज

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेल्या मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाला मंजूरी दिल्यानंतर महाविकास आघाडीचा खातेवाटप जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी भावूक पोस्ट केली आहे.
लहानपणीचा घरचा पत्ता - चाळीचे नाव श्रीपत भवन, खोली क्रमांक 6, वाडिया स्ट्रीट, ताडदेव. मुंबई.. आणि आज चाळीचा विकास करणार गृहनिर्माण मंत्री पद. ही किमया फक्त आणि फक्त शरद पवार साहेबच करू शकतात, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे ही यशाची उंची गाठली, असं आव्हाडांनी सूचित केलं आहे.
लहानपणी मुंबईतील एका चाळीतल्या खोलीत राहणारा मुलगा आज राज्याची गृहनिर्माण खात्याची जबाबदारी सांभाळणार आहे. आव्हाडांचा हा प्रवास सामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.