भूमी अभिलेख कार्यालयामधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करा -प्रदीप नाईक

0 झुंजार झेप न्युज

पुणे प्रतिनिधी :
पुणे जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयामधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समिती पुणे जिल्हाध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
याबाबत प्रदीप नाईक यांनी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन याची त्यांना माहिती दिली.
त्यांनी थोरात यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मावळ तालुका वगळता इतरत्र पुणे जिल्ह्यातील सर्व भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक आणि फसवणूक केली जात आहे. तसेच अशा कार्यालयात भ्रष्टाचार होत असून यावर ठोस पावले उचलून भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी मागणी महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समिती पुणे जिल्हाध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी ठोस पावले उचलावीत आणि होणाऱ्या भ्रष्टाचाराला त्यांनी आळा घालावा. तसेच भ्रष्ट अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी. त्यांची चौकशी करावी तसेच सर्वसामान्य जनतेला या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या जाचातून सोडवावे, असे त्यांना लेखी निवेदन दिले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.