मुंबई | काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची कार्यकर्त्यांना साद घालणारी फेसबुक पोस्ट व्हायरल झाली होती, आता त्यांच्या भगिनी आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनीही एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मराठाड्याच्या प्राणी प्रश्नासाठी पंकजा मुंडे यांनी उभारलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादला येण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे.
पंकजा मुंडे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार असून यामध्ये भाजपचे बडे नेते सहभागी होणार असल्याचं कळतंय. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या योजनेची अंमलबजावणी करणं, मराठवाड्याच्या हक्काचं पाणी, जलसंधारण, पाण्याचे संवर्धन, पिण्याचे पाणी या मुद्द्यांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पंकजा मुंडे उपोषण करणार आहेत.

