पुणे : कन्सीव इंडिया आयव्हीएफ च्या संचालक डॉक्टर माधुरी रॉय यांना पुणे येथे टाइम्स आयकॉन ऑफ हेल्थ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले

0 झुंजार झेप न्युज

पुणे:  इंडिया आय एफ च्या संचालक डॉक्टर माधुरी रॉय यांना 16 डिसेंबर 2019 रोजी टाइम्स ऑफ इंडियाने टाईम्स आयकॉन ऑफ हेल्थ पुरस्कार देऊन गौरवित केले. टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप च्या वतीने ग्रँड हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात पुण्यातील सर्वोत्तम उपचार प्रदान केल्याबद्दल टाइम्स आयकॉन ऑफ हेल्थ पुरस्कार प्रमुख अतिथी लेफ्टनंट जनरल डॉक्टर डी बी शेकटकर यांच्या हस्ते देऊन गौरव केला. डॉक्टर माधुरी हे युरोप प्रशिक्षित आय व्ही एफ तज्ञ आहेत. जागतिक स्तरावरील आयविफ तंत्रज्ञान आणण्यासाठी आणि स्वस्त दरात सर्वोत्कृष्ट आयव्हीफ उपचार प्रदान केल्याबद्दल डॉक्टर माधुरी रॉय यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
वंध्यत्व पिडीत लोकांच्या जीवनात मुलाचे सुख देण्याचे एकमेव उद्दिष्ट ठेवून कन्सीव आय व्ही एफ ना युरोपियन तंत्रज्ञान भारतात आणले. जे उच्च दर्जाचे असून गरोदरपणाचे प्रमाण वाढविण्याचे आश्वासन देते. डॉक्टर माधुरी यांनी तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान सुसज्जित फर्टिलिटी क्लीनिक हस्तकल्पित केले आणि प्रजनन व स्त्रीरोग शास्त्र सेवांचा संपूर्ण संच उपलब्ध करून दिला, एअर फिल्ट्रेशन सिस्टम सह अत्याधुनिक क्लीन रूम मॉड्यूलर लॅब्स गरोदर राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट वातावरण प्रदान करते. मिडिल ईस्ट (मस्कट ओमान) देशात पंधरा वर्षांहून अधिक वर्षाचा अनुभव घेऊन प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आय व्ही एफ कन्सल्टंट म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर माधुरी रॉय यांनी अमेरिकन, युरोपियन, फिलिपिनो ,श्रीलंका, स्पेनिश, व्हेनेझुएला, बांगलादेश, पाकिस्तान, मलेशिया, आफ्रिकन, ओमानी, युएई देशी लोकांचा सफल उपचार केलेला आहे. या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर माधुरी चीफ आय व्ही एफ कन्सल्टंट आणि इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की त्यांचे वंध्यत्व नाहीसे करायचे उद्दिष्ट आहे. वंध्यत्व हे विवाहित जोडप्यांमध्ये नैराश्य, अत्याचार आणि घटस्फोटाचे कारण आहे. आयव्हीएफ उपचार तसेच प्रजनन क्षमता (शुक्राणू, अंडी, गेमटे ,बँकिंग) बद्दल जनजागृती नसते ज्यासाठी आम्ही जागृकता शिबिरे घेतो. नैतिक पद्धती, रुग्णांची सुरक्षा आणि गोपनीयता सुनिश्चित करून गर्भधारणा करण्याचा आमच्या प्रयत्नांना हा पुरस्कार दिला जातो. टाइम्स आयकॉन ऑफ हेल्थ मिळविणे हा माझा मोठा सन्मान होता.तथापि आनंदी कुटुंबासाठी प्रत्येक यशस्वी गर्भधारणा हा आपल्यासाठी सर्वात मोठा आणि सर्वात मौल्यवान पुरस्कार आहे. हेल्थकेअर आणि वेलनेस या क्षेत्रातील आमच्या सेवेचे कौतुक केल्याबद्दल आम्ही नम्र असून आदरणीय टाईम्स ऑफ इंडिया या समूहाचे आभारी आहोत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.