मॅरेथॉनमध्ये फुगे फुगवताना गॅस सिलेंडरचा स्फोट; सहाजण जखमी

0 झुंजार झेप न्युज

मुंबई : सोलापूर येथे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवेळी गॅसचे फुगे भरताना स्फोट होऊन सहाजण जखमी झाले आहेत. यात एका महिलेसह 14 वर्षांच्या मुलाचा देखील समावेश असल्याचे सांगण्यात येते. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. स्पर्धा सुरु होण्याच्या काही क्षण आधी हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली होती. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी लगेचच बॉम्ब शोध पथक घटनास्थळी पाचारण केले होते. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.
अधिक माहिती अशी, सोलापूर येथे रविवारी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील स्पर्धक शहरात दाखल झाले आहेत. दरम्यान, पहाटे स्पर्धेत गॅस फुगे विकण्यासाठी एक कुटुंब आले होते. त्यांच्याकडून गॅस फुगे तयार केले जात असतानाच अचानक स्फोट झाला. यात एकूण सहाजण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. यातील 5 जणांना सीएनएक्‍स रुग्णालयात तर एकाला अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.