पुण्यात घरफोडीचे सत्र कायम, पुन्हा 3 फ्लॅट फोडले | झुंजार झेप न्यूज

0 झुंजार झेप न्युज

पुणे प्रतिनिधी :
पुणे : शहरात घरफोड्यांचे सत्र कायम असून, पुन्हा चोरट्यांनी तीन बंद फ्लॅट फोडून लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. शहरात पोलिसांपेक्षा गुन्हेगारांचीच दहशत असल्याचे पाहिला मिळत आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात 70 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे शंकरशेठ रोडवरील मिरा हाऊसिंग सोसायटीत राहण्यास आहेत. दरम्यान, ते कामानिमित्त कुटूंबियासह 2 ते 5 जानेवारी या कालावधीत घराला कुलूप लावून गेले होते. त्यादरम्यान, चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, बेडरूममधील 3 लाख 58 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली. रविवारी ते परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीसांना माहिती दिली. स्वारगेट पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अधिक तपास स्वारगटे पोलीस करत आहेत.
तर, एरंडवणा परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून 3 लाखांचे दागिने तसेच 6 हजारांचे युएस डॉलर असा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी 74 वर्षीय सुभाष गुरव यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरव यांचा येथील नवसह्याद्री सोसायटीत सिंधुदुर्ग बंगला आहे. गुरव 2 ते 5 जानेवारीच्या कालावधीत बाहेर गेले होते. त्यादरम्यान, चोरट्यांनी त्यांचा फ्लॅट फोडला आहे. तिसरी घटना चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून 61 हजार रुपायांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.