उत्तर प्रदेश गारठले, 41 जणांचा मृत्यू

0 झुंजार झेप न्युज

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीसह संपुर्ण उत्तर भारतात सध्या थंडीची लाट पसरली आहे. त्यातच दिल्लीत आज सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज पहाटे रेकॉर्डब्रेक 2.5 डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, कडाक्याच्या थंडीमुळे आतापर्यत उत्तरप्रदेशमध्ये 41 जणांचा बळी घेतला आहे. त्यात कानपूर, उन्नाव व जालौन परिसराला अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. कानपूरमध्ये वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे रेल्वे तसेच विमानसेवेला फटका बसला आहे.
Delhi: Major pollutants PM 2.5 at 302 in 'very poor' category & PM 10 at 283 in 'poor category' in Lodhi Road area, according to the Air Quality Index (AQI) data.
View image on Twitter
See ANI's other Tweets


मिळलेल्या माहितीनुसार, यंदा सलग 14 दिवसांपासून सातत्याने तापमानात घट होत असून आजतर थंडीने कहर केला आहे. पुढील तीन दिवस थंडीचा प्रकोप कायम राहू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. थंडी आणि धुक्‍यामुळे दिल्लीसह उत्तरप्रदेशातील जनजीवन विस्कळित झाले आहे तसेच रेल्वेसेवादेखील ठप्प झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.