पत्रकार पद्माकर काकडे यांना देताना वरीष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर व शरद राउत साहेब
पुणे लोकल ने प्रवास करत असताना दि.14/10/2019 रोजी गर्दिचा फायदा घेउन पत्रकार पद्माकर अंबादास काकडे यांच्या खिशातील मोबाईल शिवाजी नगर स्टेशन वरून चोरट्याने गर्दिचा फायदा घेउन लंपास केला. याची रीतसर पोलिस तक्रार पुणे पोलिस स्टेशन येथे करण्यात आली. पुढील तपास शिवाजी नगर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असल्याने शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीशक श्री. बाळासाहेब कोपनर यांच्यावर जबाबदारी येउन पडली. त्यांनी तपासाची चक्रे गतीमान करण्याचे ठरविले . आणि मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली . यामध्ये मोबाईल चोर पकडण्याठी मोलाचे सहकार्य पोलिस शरद राउत यांनी केले त्यामुळे पत्रकार पद्यमाकर काकडे यांनी पोलिसाचे आभार मानले

