विरार : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ९ फेब्रुवारीला पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशाच्या बाहेर काढा, या मागणीसाठी मोर्चा काढला होता. या भव्यदिव्य मोर्चानंतर मुंबईत आता बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशींचा शोध घेत धरपड सुरू झाली. मुंबईच्या विरार भागात पोलिसांनी कारवाई करत २३ बांगलादेशी महिला व पुरूषांना अटक केली आहे.
विरारमधील अर्नाळा पोलिसांनी ही कारवाई केली. विरारमधील अर्नाळा, कळंब, राजोडी या परिसरातून २३ बांगलादेशींना अटक करण्यात आली असून अनैतिक मानवी वाहतूक, पालघर दहशतवादविरोधी पथक व अर्नाळा पोलिसांनी ही कारवाई केली. मंगळवारी (ता. ११) मध्यरात्री सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
सध्या सीएए, एनआरसी विरोधात देशात आंदोलने होत असताना. मनसेने या घुसखोरांना देशाबाहेर काढण्याचा चंगच बांधला आहे. यासह भाजपनेही रत्नागिरीत पर्यटन व्हिसा घेऊन राहणाऱ्या बांगलादेशींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे बांगलादेशी पर्यटक आक्षेपार्ह गोष्टी करत असल्याचा दावा भाजपने केलाी आहे. भाजपने या बांगलादेशींच्या अटकेची मागणी केली असून पोलिस अधिक्षकांनी या पर्टकांवर करडी नजर असल्याचे सांगितले.

