सांगलीत कार विहिरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू, चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

0 झुंजार झेप न्युज

सांगली | आटपाडी तालुक्यातील झरे गावाजवळ कार विहिरीत कोसळली आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. यामध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील झरे-पारेकरवाडी रोडवर ही घटना घडली. वॅगनार गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन पडली. त्यामुळे कारमधील पाच जणांचा गाडीतच बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
चितळी जिल्हा सातारा येथील नातेवाईकाच्या धन विधीसाठी जाताना ही घटना घडली. यामध्ये पारेकरवाडी येथील नागरिक गावापासून जवळ असणाऱ्या विहिरीमध्ये पडले. यामध्ये पाच जण मृत्युमुखी पडले एकजण काच फोडून बाहेर आल्याने बचावला आहे.
मच्छिंद्र पाटील (60), कुंडलीक बरकडे (60), गुंडा डोंबाळे (35), संगीता पाटील (40), शोभा पाटील (38) अशी मृतांची नावे आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.