पिंपरी चिंचवड : रावण टोळीतील म्होरक्‍याच्या भावाचा निर्घृण खून

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी - आकुर्डी आणि चिंचवड परिसरात दहशत माजवणाऱ्या रावण टोळीचा मोरक्या अनिकेत जाधवच्या भावाचा भरदिवसा खून करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आकुर्डी येथील पोस्ट ऑफिस समोर हा प्रकार घडला.
अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव (२५, रा. रावेत) असे खून झालेल्याचे नाव आहे. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकुर्डी येथील पोस्ट ऑफिस समोर एक गॅरेज आहे. या ठिकाणी सोन्या हा मित्रांसोबत दारु पित बसला होता. दारू पिताना त्यांच्यामध्ये भांडण झाले. यावेळी चिडलेल्या त्याच्या मित्रांनी गॅरेज मधील साहित्याने सोन्याच्या डोक्यात वार केले.
रक्तबंबाळ झालेल्या सोन्याला तेथेच सोडून मित्र पसार झाले. निगडी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. सोन्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोन्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सोन्या हा रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा भाऊ होता. निगडी पोलिसांनी संशयित ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.