Nirbhaya Case : '...त्यावेळी मी तिथे नव्हतो'; दोषी मुकेशने तोडले अकलेचे तारे!

0 झुंजार झेप न्युज

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुकेश कुमार सिंह या दोषीने घटना घडली तेव्हा मी दिल्लीत नव्हतोच असा अजब दावा करून मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली कोर्टात दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने आज फेटाळली आहे.
A Delhi Court dismissed the plea of Mukesh, one of the convicts in the 2012 Delhi gangrape case, seeking quashing of death penalty claiming that he was not in Delhi when the gangrape incident took place.
86 people are talking about this


निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशी अवघे दोन तीन दिवस शिल्लक आहेत. त्यातच फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, पवन गुप्ता या दोषींनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
अशा प्रकारे फाशीची शिक्षा टाळण्यासाठी या दोषींकडून अत्यंत खालच्या थराला जाऊन प्रयत्न होत आहेत. या प्रकरणातील आरोपी मुकेश कुमार सिंह याने आता अजब दावा करायला सुरुवात केली आहे. निर्भयावर लैंगिक अत्याचार झाले त्यादिवशी मी दिल्लीत नव्हतो, असे सांगत मुकेश सिंह याने आपल्या फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी कोर्टात केली होती. ही मागणी दिल्ली दिल्ली कोर्टाने फेटाळली आहे.

दोषी मुकेश कुमार सिंह याने आपल्या याचिकेत मला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले. बलात्काराच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबर २०१२ रोजी मला दिल्लीत आणण्यात आले. यानंतर तिहार कारागृहात माझा प्रचंड छळ करण्यात आला, असे नमूद केले आहे. मात्र, सरकारी वकिलांनी मुकेशचा हा आरोप दावा फेटाळून लावला आहे. केवळ फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी सोमवारी कोर्टाने मुकेश सिंह याची सर्व कायदेशीर पर्याय वापरू देण्याची याचिका फेटाळून लावली होती. याआधीच्या वकिलांकडून माझी दिशाभूल करण्यात आली. निर्भयाचा दोषी मुकेश कुमार सिंहने आपल्या जुन्या वकिलावर खापर फोडत पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.