वॉशिंग्टन | चीनपाठोपाठ कोरोना व्हायरसने अमेरिकेतही हातपाय पसरल्याने अमेरिकन प्रशासन हादरून गेलं असून अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणीबाणीची घोषणा केली असून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 50 अब्ज डॉलरची तरतूद केली आहे. या आधी कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी स्पेननेही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये तातडीची पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी वेळीच उपाय योजना केल्या नाहीत तर अमेरिकेतील 15 कोटी लोक या व्हायरसच्या कचाट्यात सापडू शकतात, अशी भीती ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, येणाऱ्या काळात देशवासियांना मोठी किंमत मोजावी लागेल. आता त्याग केला तर येणाऱ्या काळात त्याचा फायदाच होईल, असं ट्रम यांनी म्हटलंय.

