बारामती: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही आपल्या घरी कुटूंबियासोबत डॉक्टर, नर्स, पोलीस तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. आज नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. देशवासीयांनी त्याला उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.
शरद पवार म्हणाले, विश्वातल्या संपूर्ण जनतेवर कोरोनाचं महाभयंकर संकट आलेलं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सामूहिक आणि व्यक्तिगत पातळीवर आपण एकजुटीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी संपूर्ण देशात आपले दैनंदिन व्यवहार पूर्णपणे थांबवण्याचं आवाहन केलं. त्याला देशातल्या कानाकोपऱ्यातील लोकांनी प्रतिसाद दिला.
परंतु इथेच समाधान मानून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत पूर्णपणाने अशाच प्रकारची भूमिका घेण्याचं सुचवलेलं आहे त्याला आपण सगळेजण साथ देऊ या. आणि सर्वसामान्य माणसाला यातून वाचवण्यासाठी प्रयत्न करूया.

