राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १०१ वर पोहोचली आहे. पुणे येथे ३ आणि सातारा येथे १ नवीन रुग्ण आढळून आल्याने आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या राज्यात १०१ झाली आहे.
सोमवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकदम १५ ने वाढ झाली होती. ही संख्या ९७ वर गेली होती. मंगळवारी पुणे आणि साताऱ्यात ४ रुग्ण वाढल्याचे सकाळी स्पष्ट झाले. देशातही कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत आहे.
मुंबई उपनगर - ३८, पुणे - १९, कल्याण-४, सांगली - ४, यवतमाळ - ४, नागपूर-४, अहमदनगर - २, रायगड आणि पनवेल - २, ठाणे - २, नवी मुंबई - ५ अशी कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आहे.
Total number of positive Coronavirus cases in Maharashtra rises to 101 including 3 new cases in Pune and 1 in Satara: Health Department, Maharashtra
364 people are talking about this


