संपूर्ण राज्यात उद्यापासून कलम 144 लागू - मुख्यमंत्र्यांची घोषणा

0 झुंजार झेप न्युज


मुंबई (zunjarzep.in):- कोराना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यास रोखण्यासाठी तसेच सर्व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आज (रविवारी) जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होते. यापुर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहर हे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं होते. आज देखील कोरोनाच्या रूग्णांमध्ये महाराष्ट्रात वाढ झाली आहे. त्याचपार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. म्हणजेच आज मध्यरात्रीपासून राज्यात कलम 144 लागू करण्याची घोषणा केली आहे.
मा.मुख्यमंत्री यांच्या “लाईव्ह” प्रसारणातील महत्वाचे मुद्दे
आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू
आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झालं आहे. जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा.
महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका. रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करीत आहोत.जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील.अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील.बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील.शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.  आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत.
ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.
चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत.
३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल.
सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद.
अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती.
पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.