लंडनच्या तरुणीने वृत्तपत्रात दिली जाहिरात म्हणाली, मीच होणार मुख्यमंत्री!

0 झुंजार झेप न्युज

पाटणाः दरभंगाचे जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी हिनं बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. तिनं स्वतःची मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली असून, बऱ्याच वर्तमान पत्रात तिनं याची जाहिरातही दिली आहे. तिनं बिहारच्या जनतेला संबोधित करत एक पत्रसुद्धा लिहिलं आहे.
प्लूरल्स नावानं तयार केला राजकीय पक्ष
लंडनमध्ये वास्तव्याला असलेल्या पुष्पम प्रिया चौधरीनं प्लूरल्स (PLURALS) नावानं पक्षाची स्थापना केली असून, त्या पक्षाची ती अध्यक्ष आहे.
पुष्पम प्रियानं लंडनमधल्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सेजमधून मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन केलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सच्या आयडीएसमधून तिनं डेव्हलपमेंट स्टडिजमध्ये एमएसुद्धा केलं आहे.
पुष्पम प्रिया चौधरीनं ट्विट करत बिहारच्या जनतेला आवाहन केलं आहे की, बिहारच्या प्रगतीला वेग पाहिजे असेल तर बिहारमध्ये बदल घडलाच पाहिजे. कारण बिहारला आणखी प्रगती करण्याचा हक्क आहे. बिहारला 2020मध्ये प्रगतिपथावर नेण्यासाठी आणि उड्डाण भरण्यासाठी प्लूरल्स (पार्टी)शी जोडले जावा.
Bihar needs pace, Bihar needs wings, Bihar needs change. Because Bihar deserves better and better is possible. Reject bullshit politics, join Plurals to make Bihar run and fly in 2020.
View image on Twitter
510 people are talking about this
पुष्पम प्रिया चौधरी हिनं ट्विट करत लिहिलं की, एलएसई आणि आयडीएसमधील मी केलेल्या अभ्यासानं आणि बिहारमधील माझ्या अनुभवांनी मला हे शिकवले आहे की, प्रत्येक व्यक्तीचे वेगळेपण असते. त्यामुळेच सर्वांच्या विकासाचं एकच मॉडल नसतं. पुष्पम प्रियाचे काका अजय चौधरी ऊर्फ विनय जेडीयूमध्ये आहेत. तसेच ते दरभंगा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. पुष्पम प्रिया हिचे आजोबा दिवंगत उमाकांत चौधरी हे नितीश कुमारांचे जवळचे मित्र राहिलेले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.