#INDvSA 1st ODI : पावसामुळे पहिला एकदिवसीय सामना रद्द

0 झुंजार झेप न्युज


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसानं व्यत्यय आणला आहे. हा सामना दुपारी १.३० सुरू होणार होता, पण पावसानं अजूनही विश्रांती घेतलेली नाही. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे नाणेफेकही झालेली नाही. पावसाचा जोर कायम राहिल्यानं अखेरीस साडेपाचच्या सुमारास हा सामना रद्द झाल्याची घोषणा बीसीसीआयनं केली.

त्यामुळे गुरुवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होतीच. पावसामुळे १ वाजता होणारी नाणेफेक लांबणीवर गेली. १.१५ वाजता खेळपट्टीची पाहणी करण्यात येणार होती, परंतु पाऊस थांबला नाही. त्यामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. दोन तास पावसानं वाया घालवल्यानंतर बीसीसीआयनं Cut Off वेळ जाहीर केला होता. जर सामना सुरू होण्यासाठी ६.३० वाजले तर तो प्रत्येकी २०-२० षटकांचा होईल, असे जाहीर केले गेले. पण, साडेतीन सात पावसाचा जोर कायम राहिल्यानं अखेरीस सामना रद्द करावा लागला.
२०१९मध्ये उभय संघांमध्ये धरमशाला येथे झालेला एकमेव ट्वेंटी-२० सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर ती मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. तीन वन डे सानम्यांच्या मालिकेतील दुसरा सामना १५ मार्चला लखनऊ येथे होईल, त्यानंतर १८ मार्चला कोलकाता येथे अखेरचा सामना होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.