सहायक फौजदाराची आत्महत्या, शहरात एकच खळबळ

0 झुंजार झेप न्युज

यवतमाळ: शहर पोलीस ठाण्याच्या डीबी रुममध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली आहे. राजू उईके असे या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते लगतच्या वाघापूर येथील रहिवासी आहे.

एएसआय राजू रात्री गस्तीवर होते. एक वाजेपर्यंत ते ड्युटीवरही होते. दरम्यान रात्री त्यांनी युनिफॉर्मवरच डीबी रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी पोलीस कर्मचारी तेथे गेले असता ही घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच शहर ठाणेदार धनंजय सायरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मात्र जात वैधता प्रमाणपत्रामुळे ते गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते, असे पोलीस कर्मचाऱ्यांच्या चर्चेतून पुढे आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.