मुंबई, दि. १५: आज राज्यातकोरोना बाधित २३२ नवीन रुग्णांचीनोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या २९१६ झाली आहे. आजदिवसभरात ३६ रुग्णांना घरीसोडण्यात आले असून आतापर्यंतराज्यभरात २९५ रुग्ण बरे झालेआहेत. अशी माहिती आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या५२ हजार नमुन्यांपैकी ४८ हजार१९८ जणांचे प्रयोगशाळा नमुनेकोरोना करिता निगेटिव्ह आलेआहेत तर २९१६ जण पॉझिटिव्हआले आहेत. सध्या राज्यात ६९हजार ७३८ लोक होमक्वारंटाईनमध्ये असून ५६१७ लोकसंस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज ९ कोरोना बाधितरुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकीमुंबईचे २, पुण्यातील ६ तर अकोलामनपा येथील १ रुग्ण आहे. त्यात ६ पुरुष तर ३ महिला आहेत.आज झालेल्या ९ मृत्यूपैकी ४ जणहे ६० वर्षांवरील आहेत ३ रुग्ण हेवय वर्षे ४० ते ६० या वयोगटातीलआहेत. तर दोघेजण ४०वर्षाखालील आहेत. मृत्युमुखीपडलेल्या ९ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये(६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब,अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचेअतिजोखमीचे आजार आढळलेआहेत. कोरोनामुळे राज्यातझालेल्या मृत्यूंची संख्या आता १८७झाली आहे.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचेक्लस्टर सापडले आहेत त्याठिकाणी केंद्र सरकारच्यामार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंटकृतियोजना अंमलात आणण्यातयेत आहे. राज्यात आज एकूण५३९४ सर्वेक्षण पथकांनी कामकेले असून त्यांनी २० लाखाहूनअधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेलेआहे.

