दिवसभरात 104 गुन्ह्यांची नोंद, तर 50 लाख 86 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

0 झुंजार झेप न्युज

मुंबई दि. 15: कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील ‌ सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद आहे. अवैध मद्य निर्मितीवाहतूकविक्रीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई सुरू आहे. काल म्हणजेच 14 एप्रिल 2020 रोजी राज्यात 104 गुन्हे नोंदविण्यात आले असून 59 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 14 वाहने जप्त करण्याबरोबरच 50 लाख 86 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

14 तारखेच्या अवैध मद्याविरुद्ध कारवाईमध्ये सर्वात मोठी कारवाई अहमदनगर जिल्ह्याची असून तेथे निमगाव कोऱ्हाळे तालुका राहता येथे बिअरचे 844 बॉक्स व वाईनचे 120 बॉक्स असे एकूण 24.39 लाख किमतीचे 964 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.

24 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत राज्यात हजार 697  गुन्हे नोंदविण्यात आले असून हजार 103 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 157 वाहने जप्त करण्यात आली असून कोटी 894 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्य निर्मितीवाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४×७ सुरू आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००८३३३३३३ व्हाट्सअप क्रमांक ८४२२००११३३  आहे. या क्रंमाकावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.