मुंबई, दि. 14 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज मंत्रालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुस्तकांचे वाचन करुन 14 एप्रिल हा दिवस वाचन दिन म्हणून घरातच साजरा करावा, असे आवाहनही भुजबळ यांनी राज्यातील जनतेला केले होते.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोट्यवधी लोकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवला. त्यांची शिकवण डोळ्यासमोर सर्वांनी कायम ठेवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

