Pimpri: महापालिका, ‘वायसीएम’च्या प्रवेशद्वारावर ‘सॅनिटायझर टनेल’ बसवा – नाना काटे

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालय (वायसीएम) तसेच महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर ‘सॅनिटायझर टनेल’ बसविण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. 
नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज अखेरपर्यंत सुमारे २२ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यापैकी १२ रुग्णांवर यशस्वी वैद्यकीय उपचार करण्यात येऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये १० रुग्णांवर यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत. राज्यात तसेच पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा, पोलिस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे, परंतु कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता अजून प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांवर संत तुकारामनगर येथील मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. या रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई  कर्मचारी त्याच प्रमाणे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीवर्ग यांना संभाव्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर तसेच मनपाच्या मुख्यालयातील प्रवेशव्दारावर कर्मचा-यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यासाठी ‘सॅनिटायझर टनेल’ बसविण्यात यावे. तसेच या ‘थर्मल स्कँनर’ची सोय करण्यात यावी. म्हणजे अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. राज्यभरामध्ये मुंबई, पुणे, नागपूर तसेच आजच पिंपरी पोलिस प्रशासनानेही ‘सॅनिटायझर टनेल’ वापरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये व मुख्यालयामध्ये ‘सॅनिटायझर टनेल’ बसविणे यावेत. तसेच ‘थर्मल स्कँनर’ची सोय करण्यात यावी अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.