जगभरात कहर माजवलेल्या कोरोना विषाणुने आपल्या उंबरट्यावर पिंपरी चिंचवडमध्ये धडक दिली आहे. शहरात आजपर्यंत २२ रूग्ण आढळले असून सध्या १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान भोसरी परिसरात एक रूग्ण आढळला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भोसरी गाव तीन दिवस पूर्णपणे ‘सील’ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दि.१० ते १२ एप्रिल या कालावधीत भाजीपाला, किराणा माल, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील बंद राहणार आहेत. तर भोसरीतील सर्व दुकानदार, नागरिकांनी प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करावे. घरातून बाहेर पडून नये असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. भोसरी परिसरात देखील कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भोसरीकरांनी एकमताने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भोसरीगाव शुक्रवार दि.१० पासून रविवार दि.१२ पर्यंत ३ दिवस पूर्णपणे भोसरी परिसर बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात सर्व दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. तरी नागरिकांनी प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करावे. घरातून बाहेर पडून नये असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

