Chinchwad : सोनिया गांधी यांच्यावर टीका केल्याबाबत अर्नब गोस्वामी विरोधात गुन्हा दाखल करा; पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसची मागणी

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी : आर रिपब्लिक टीव्ही चे व्यवस्थापक-संचालक अर्नब गोस्वामी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा, खासदार श्रीमती सोनीया गांधी यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन खोटी टिका -टिपणी केली त्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे अर्नब गोस्वामी विरुद्ध गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. 
२१ एप्रिलला दाखवलेल्या टिवी शोमध्ये चर्चेदरम्यान दोन समाजामध्ये मध्ये तेढ निर्माण होईल असे जाणीव पूर्वक भाष्य गोस्वामी यांनी केले, १७ एप्रिल रोजीच्या पालघर येथील झुंडबळीच्या न्यायप्रविष्ट असलेल्या घटनेबद्दल त्यांचे विधान हे हेतुपुरस्सर व दृष्ट उद्देशाने केलेले आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या विरुद्ध अपशब्द वापरून समाजामध्ये प्रतिमा खालविण्याच्या दृष्टिकोनातून व संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां बद्दल अपशब्द वापरले आणि राष्ट्रीय एकोपा बिघडविण्याच्या प्रयत्नाने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिस आयुक्तांकडे गोस्वामी यांच्या विरुद्ध कलम १५३ अ, १५३- ब, २९५ – अ, ५००, भा.द. वि. १८६० नूसार नरेंद्र बनसोडे यांनी तक्रार दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.