पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात कोरोनाचे २ ‘पॉझिटिव्ह’, निगडी रूपीनगरचा भाग मध्यरात्रीपासून सील होणार..!

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होत आहे. आज (दि.२३) दिवसभरात दोन जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे शहरातील आजपर्यंतचा कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ६९ झाला आहे. दरम्यान आज पॉझिटिव्ह आढळलेला रूग्ण हा निगडी रूपीनगरच्या परिसरातील रहिवासी असल्यामुळे तेथील काही भाग आज मध्यरात्रीपासून सील करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात दोन कोरोनाचे ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण आढळले आहेत. त्यातील एक २६ वर्षीय रूग्ण हा निगडी रुपीनगर परिसरातील रहिवासी आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या काही जणांना महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिसरात रुग्ण सापडल्याने हा भाग सील करण्यात आला आहे. रुपीनगर निगडी येथील हनुमान मंदिर-समर्थ सुपर मार्केट-भाग्यलक्ष्मी बस पार्किंग-ओम साई दुध डेअरी-भूषण गॅस एजन्सी-लकी एंटरप्रायजेस-ज्ञानदिप प्रायमरी स्कूल-माऊली मेडिकल-आयसीआयसीआ बँक एटीएम-हनुमान मंदिराचा परिसर आज दि.२३ रोजी मध्यरात्री ११ वाजल्यापासून सील केला जाणार आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.
तसेच आज दुसरा पॉझिटिव्ह आढळलेला रूग्ण हा ३९ वर्षीय पुरूष आहे. ही व्यक्ती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दी बाहेरील आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंत कोरोनाबाधित आढळलेल्या रूग्णांचा आकडा ६९ झाला आहे. तर सध्या वायसीएम रूग्णालयात ३७ पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू असून उर्वरीत रूग्णांवर शहराबाहेर उपचार सुरू आहेत.
दरम्यान आज भोसरी येथील ०१ रूग्ण कोरोनामुक्त झाला असून त्याला घरी सोडण्यात आले. आजपर्यंत २१ जणंना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर शहरात आजपर्यंत तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यातील दोन शहरातील रहिवासी होते.
पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स
दि.२३ एप्रिल २०२० रोजी अपडेट्स सायं. ६.०० वाजेपर्यंतचे
● आज दाखल झालेले संशयित रूग्ण = ८०
● आज तपासणीत निगेटिव्ह आलेले रूग्ण = ७९
● सध्या कोरोना बाधित रूग्ण = ४५ (३७ रूग्ण वायसीएममध्ये, उर्वरित रूग्ण शहराबाहेरील रूग्णालयात)
● कोरोनामुक्त रूग्णांची संख्या = २१ (आज ०१ रूग्ण कोरोनामुक्त)
● गेल्या २४ तासात वाढलेले पॉझिटिव्ह रूग्ण = ०२
● प्रतिक्षेतील अहवाल = ८०
● आजपर्यंत मृत रूग्णांची संख्या = ०३(पीसीएमसी २ + १ शहराबाहेरील)
● होम क्वारंटाईन एकूण संख्या  = ३०६३
● आजपर्यंत कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण संख्या = ६९
● दैनंदिन सर्व्हेक्षण केलेली लोकसंख्या = ५८,९५४
😷 STAY HOME 🏚️ STAY SAFE 😷
Source – PCMC Health Dept.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.