आनंदाची बातमी! ऑक्सफर्डच्या लशीची चाचणी पुन्हा सुरु

0 झुंजार झेप न्युज

 रमेश ब्रम्हा संपादक  झुंजार झेप 

मो. 9146400308

आनंदाची बातमी! ऑक्सफर्डच्या लशीची चाचणी पुन्हा सुरु

.यूकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य नियामक मंडळाच्या शिफारशीनंतर ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाला पुन्हा आपल्या लसीची चाचणी सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

.ऑक्सफर्ड लसीच्या भारतातील चाचण्यांबाबत DCGI काय निर्णय देणार? याकडे आता लक्ष लागले आहे.



लंडन : जगभरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. यूकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य नियामक मंडळाच्या शिफारशीनंतर ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाला पुन्हा आपल्या लसीची चाचणी सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मागील आठवड्यात लस टोचलेला एक स्वयंसेवक आजार पडल्याने लसीची चाचणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर भारतातील सीरम इन्स्टिट्यूटलाही चाचण्या थाबवण्यास सांगितले होते.

ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या कोरोनावरील लस तिच्या मानवी चाचणीच्या टप्प्यात होती. अ‍ॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लशीच्या मानवी चाचणीत सामील असलेला एक व्यक्ती आजारी पडला होता. त्यामुळे या लसीची चाचणी थांबवण्यात आली होती. अ‍ॅस्ट्राझेनेकाने एक निवेदन जारी करत याबाबतची माहिती दिली होती.
या लसीला एझेडडी -1222 (AZD1222)असे नाव देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगातील इतर लसींच्या चाचण्यांच्या तुलनेत ही लस आघाडीवर आहे. सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून आहे. या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात हजारो स्वयंसेवकांचा सहभाग आहे.
ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांना तात्पुरती स्थगिती; भारतात सीरम इन्स्टिट्यूटला मात्र दिलासा

रुग्णाच्या आजाराच्या कारणांचा शोध सुरु
अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही सामान्य प्रक्रिया आहे. आता रुग्णाच्या आजाराच्या कारणांचा शोध घेतला जाईल जेणेकरुन चाचणीची विश्वासार्हता कायम राहिल. मोठ्या प्रमाणावर चाचणी होत असल्यास स्वयंसेवक आजारी पडण्याची शक्यता असते. पण याचा स्वतंत्ररित्या सतर्कतेने तपास होणं गरजेचं आहे. आम्ही याचा शोध घेत आहोत, जेणेकरुन चाचणीच्या मुदतीवर याचा परिणाम होऊ नये." ऑक्सफर्डच्या लसीत दुसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान स्वयंसेवकांमध्ये अँटीबॉडी विकसित होत असल्याचं समोर आलं होतं.

ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांना ChAdOx1 nCoV-19 लसीच्या यशाबाबत खात्री आहे. शिवाय त्यांना 80 टक्के विश्वास आहे की ही लस सप्टेंबरमध्ये उपलब्ध होईल. ऑक्सफर्डच्या लसीचं उत्पादन AstraZeneca ही कंपनी करणार आहे. ही लस ChAdOx1 व्हायरसपासून बनली आहे, जो सामान्य सर्दी निर्माण करणाऱ्या विषाणूचा कमकुवत स्वरुप आहे. यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जेणेकरुन मानवी शरीराला त्याचा संसर्ग होणार नाही.

Corona Vaccine | कोरोना लसीवरील संशोधनाला भारतातही ब्रेक, सीरम इन्स्टिट्यूटने चाचणी थांबवली
Follow us in-

Tnstgram -@zunjarzepnews 

Twittr-@झुंजार झेप  

Fecebook -@zunjarzep





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.