रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप
मो. 9146400308
प्लाझ्मा मशीनची संख्या वाढवा – महापौर माई ढोरे
पिंपरी :‐(झुंजार झेप ) कोविड-१९ संसर्ग झालेल्या रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांमधून यशस्वी उपचार करुन रुग्ण बरे होत आहेत. या उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी वरदान ठरत आहे.त्यामुुुळे प्लाझ्मा मशीनची संख्या वाढविण्याबाबत महापौर माई ढोरे यांनी आयुुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.
महापौर पत्रात म्हणतात, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग, प्रादुर्भाव व रुग्णांचे वाढते मृत्यू लक्षात घेता कोरोना संकटाचा सामना अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महापालिकेकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोविड-१९ संसर्ग झालेल्या रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांमधून यशस्वी उपचार करुन रुग्ण बरे होत आहेत. या उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी वरदान ठरत आहे. तथापि वाय.सी.एम.रुग्णालयामध्ये प्लाझ्मा
जमा करण्यासाठी एकच मशीन असल्याने प्लाझ्मा-दाते व रुग्णाचे नातेवाईक दोघांचीही प्रचंड गैरसोय होत असल्याबाबत श्री.संजय गायखे यांनी माझ्याकडे कळविले आहे.तरी ही बाब अतिशय गंभीर असून सध्याच्या कोरोनाच्या आपातकालीन परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्लाझ्मा जमा करणाऱ्या अधिक मशीन्सची आवश्यकता असून याबाबत आपण त्वरित
शहानिशा करुन प्लाझ्मा मशीनची संख्या वाढविण्याबाबत संबंधितांस निर्देश द्यावेत.
Follow us in-

