चिचवडं :येथील स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून आज रावेत पोलिस चौकी परीसरात वंचित घटकांतील लहान मुलं दिवाळीच्या आनंदाला मुकू नयेत, याकरीता मुलांना फराळाचे गुरुवारी वाटप करण्यात आले.
चिचवडं: कोरोनामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती विस्कटली आहे. अशा परिस्थितीतीत दिवाळी ही तुमची माझी तर आहेच पण समाजात राहणार्या आपल्या सर्व बांधवांची देखील आहे. दिवाळीचा आनंद जसा आपल्या घरामध्ये आपण साजरा करतो तसाच समाजात प्रत्येक घरांमध्ये व्हावा, हीच इच्छा व त्यासाठी केलेला प्रयत्न चिंचवड येथील स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप, यांच्या माध्यमातून आज रावेत पोलिस चौकी परीसरात बांधकाम करणार्या मजुरांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात रोजगार बंद पडल्याने हाती काहीच शिल्लक नाही. हातावर पोट असणार्या वेठबिगार व असंघटित कामगार बांधवांची ही व्यथा आपल्या सर्वांच्या लक्षात येते आणि म्हणूनच गरजवंत बांधवांचे कुटुंब दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहू नये, म्हणून स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक भावना, जबाबदारी लक्षात घेऊन त्यांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप, तसेच रावेत पोलिस चौकीचे कर्मचारी डी.डी. चौधरी, बी.डी. गवारी, एन.डी. टिळेकर, व्ही.सी. गोर्डे, पीएसआय दळवी आदी कर्मचार्यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेच्या सदस्या जयश्री विरकर, कांचन राजकर, अॅड. पूनम राऊत, चित्रा बंगेरा आदींनी परिश्रम घेतले.

