IPL 2020 : बुम... बुम... बुमराह! दिल्लीवर जसप्रीत बुमराह भारी; रबाडाला मागे टाकत पर्पल कॅपवर कब्जा
पर्पल कॅपवर बुमराहचा कब्जा
दिल्लीच्या विरोधात जसप्रीत बुमराह (14 धावा देत चार विकेट) आणि ट्रेंट बोल्ट (दो ओव्हर्समध्ये नऊ धावा देत दोन विकेट्स) यांनी धमाकेदार खेळी केली. पर्पल कॅपच्या शर्यतीत पुन्हा मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आघाडीवर आहे. बुमराहने 14 सामन्यांमध्ये 27 विकेट्स घेतले आहे. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आहे, ज्याच्या नावावर 25 विकेट्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आहे. त्याने 14 सामन्यांमध्ये 22 विकेट्स घेतले आहेत. चौथ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आहे. त्याने 20 विकेट्स घेतले आहेत. तर पाचव्या क्रमांकावर आरसीबीचा स्पिनर युजवेंद्र चहल आहे, ज्याने आतापर्यंत 20 विकेट्स घेतले आहेत.
ईशान किशनची धमाकेदार खेळी
दिल्ली कॅपिटल्स विरोधात 55 धावांची खेळी करणाऱ्या मुंबईच्या ईशान किशनने या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ईशान किशन चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये 4 अर्धशतकं फटकावत आतापर्यंत 483 धावा केल्या आहेत. आयपीएल 2020 मध्ये 670 धावा केलेल्या केएल राहुलने ऑरेंज कॅपचा मान आपल्याकडेच ठेवला आहेत. दरम्यान, केएल राहुलचा संघ किंग्स इलेव्हन पंजाब प्लेऑफमध्ये पोहचू शकला नाही.
दुसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आहे. ज्याने 539 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज शिखर धवन आहे. ज्याने 525 धावा केल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा फलंदाज क्विंटन डी कॉक आहे, ज्याने 483 धावा केल्या आहेत.

