दरवाढीचा भडका! महाराष्ट्रासह देशभरात पेट्रोलचे भाव 90 पार; डिझेलही 80च्या पुढे

0 झुंजार झेप न्युज

 

दरवाढीचा भडका! महाराष्ट्रासह देशभरात पेट्रोलचे भाव 90 पार; डिझेलही 80च्या पुढे

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ अजूनही थांबलेली नाही. 


मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ अजूनही थांबलेली नाही. आज सरकारी कंपन्यांनी पेट्रोलचे भाव 28 पैशांनी आणि डिझेलचे दर 30 पैशांनी वाढवल्याने मुंबईत पेट्रोल 90.05 रुपये प्रति लिटर विकलं जात असून डिझेल 80.23 रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. मुंबईसह राज्यातील अन्य भागांसह देशातही पेट्रोलचे भाव नव्वदी तर डिझेलचे दर ऐंशी पार गेले आहेत.


आज पाव्या दिवशीही पेट्रोल- डिझेलचे दर वाढले आहेत. दिल्लीत 20 नोव्हेंबरपासून आतापर्यंत 14 टप्प्यांमध्ये पेट्रोल 2.35 रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेलचे भाव 3.15 रुपयांनी वाढले आहेत. रविवारी दिल्लीत पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढल्याने पेट्रोलचे दर 83.41 रुपये आणि डिझेलचे दर 29 पैशांनी वाढल्याने 73.61 रुपये प्रति लिटर झाले आहेत.


ऑक्टोबरमध्ये दिलासा

यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताच बदल झाला नव्हता. ऑगस्टमध्ये पेट्रोल आणि त्याआधी जुलैमध्ये डिझेलच्या दरात वाढ झाली होती. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव 50 डॉलर प्रति बॅरल झाले होते. मात्र, गेल्या महिन्यात कच्चा तेलाचे दर वाढले होते.


महाराष्ट्राला सर्वाधिक फटका

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. मुंबईत रविवारी पेट्रोलचे भाव 27 पैशांनी वाढले होते. त्यामुळे पेट्रोलचे भाव वाढून 90.05 रुपये प्रति लिटर झाले. तर डिझेलचे भाव 30 पैशांनी वाढल्याने डिझेलचे दर 80.23 रुपये प्रति लिटर झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांचे कंबरडे मोडले आहे.


नाशिकमध्ये दुसऱ्यांदा वाढ

नाशिकमध्ये दोन वर्षापूर्वीही पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले होते. त्यावेळीही 80 ते 90च्या पार हे दर गेले होते. आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये पेट्रोलचे दर 90.76 रुपये झाले आहे. तर डिझेलचे दर 79.71 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. त्यामुळे नाशिककरांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.


अजून दरवाढ होणार

ओपेक देशांनी जानेवारीपासून उत्पादनात 5 लाख बॅरलची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मेट्रो शहरातील दर वाढ

कोलकाता: पेट्रोल 84.90 रुपये प्रति लिटर

कोलकाता: डिझेल 77.18 रुपये प्रति लिटर

चेन्नई : पेट्रोल 86.25 रुपये प्रति लिटर

चेन्नई : डिझेल 78.97 रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील दरवाढ

पेट्रोल प्रति लिटर (रुपयांत)

मुंबई : 90.05

ठाणे: 90.39

पुणे : 90

नाशिक : 90.76

औरंगाबाद : 91.53

बीड : 91.36

नागपूर : 90.18

रत्नागिरी : 91.72

जळगाव : 91.52

अमरावती: 91.73

चंद्रपूर : 90.28

वर्धा : 90.79

कोल्हापूर: 90.58

लातूर: 91.39

नांदेड: 92.53

डिझेल प्रति लिटर (रुपयांत)

मुंबई : 80.23

ठाणे: 80.56

पुणे : 78.97

नाशिक : 79.71

औरंगाबाद : 81.71

बीड : 80.3

नागपूर : 79.18

रत्नागिरी : 80.66

जळगाव : 80.44

अमरावती: 81.93

चंद्रपूर : 79.29

वर्धा : 79.77

कोल्हापूर: 79.56

लातूर: 80.33

नांदेड: 81.43

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.