ताई लवकर बरी हो, मोठा भाऊ म्हणून मी तुझ्यासोबत; आयसोलेट झालेल्या पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंचा फोन

0 झुंजार झेप न्युज

 

ताई लवकर बरी हो, मोठा भाऊ म्हणून मी तुझ्यासोबत; आयसोलेट झालेल्या पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंचा फोन

पंकजा मुंडे आजारी असल्याचं समजल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फोनवरुन त्यांची विचारपूस केली. "ताई लवकर बरी हो, मोठा भाऊ म्हणून मी तुझ्यासोबत आहे," अशा शब्दात त्यांनी दिलासा दिला.


मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आजारी असल्याचं समजल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फोनवरुन त्यांची विचारपूस केली. "ताई तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे," अशा शब्दात त्यांनी पंकजा यांना दिलासा दिला. सर्दी, खोकला आणि ताप असल्यामुळे पंकजा मुंडे आयसोलेट झाल्या आहेत.


धनंजय मुंडे म्हणाले की, "पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे. तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करुन घे. स्वतःची आणि घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे.


पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला आणि ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. खबरदारी म्हणून त्यांनी होम आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला.




पंकजा मुंडे या आजारी असल्याचे समजल्यानंतर धनंजय मुडे यांनी फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. पंकजा मुंडे यांनी कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबतच्या सर्व चाचण्या करुन घ्याव्यात, स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी आणि लवकर बऱ्या व्हा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोनवरुन दिला आहे. तसंच पंकजा मुंडे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या.


दरम्यान धनंजय मुंडे यांनाही जून महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. यशस्वीरित्या कोरोनावर मात करुन ते घरी परतले. त्यामुळे कोविड-19 या आजारात होणाऱ्या त्रासाचा अनुभन असल्याने त्यादृष्टीने काळजी घेण्याचा सल्ला धनंजय मुंडे यांनी पकंजा मुंडे यांना दिल्याचं समजतं

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.