वाढवण बंदराविरोधात आज वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं बंदची हाक दिली आहे.

0 झुंजार झेप न्युज

वाढवण बंदराविरोधात आज वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं बंदची हाक दिली आहे.

पालघर: केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदराला विरोध होत आहे. वाढवण बंदराविरोधात आज वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं बंदची हाक दिली आहे. मुंबई, डहाणू, कफ परेड, वसई -विरार, डहाणू ते तलासरी झाई पर्यंतचे सर्व कोळीवाडे, मच्छीमार्केट, बंद ठेवण्यात आले आहेत. बंदला अनेक मच्छीमार संघटनानी पाठिंबा दर्शविला आहे.

पारंपारिक मच्छीमार देशोधडीला लागणार असल्याची भावना

वाढवणं बंदर निर्माण करण्याच्या निर्णयामुळे पारंपारिक मच्छीमार देशोधडीला लागणार आहेत, अशी भावना मच्छीमांरामंध्ये आहे. सरकारचे या भावनेकडे लक्ष वेधण्यासाठी मच्छी मार्केट बंद ठेवण्यात आली आहेत. वाढवण बंदर निर्मितीचा प्रस्ताव रद्द करावा, या मागणीसाठी मच्छीमार या बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

वसईतील मासळी बाजर बंद

वसई मच्छीमार संस्थेच्या आवारात रात्री 11 वाजता आणि सकाळी 6.00 वाजता भरणारे मासळी बाजार आज बंद ठेवण्यात आले आहेत. वसई कोळीवाडा, जुने मटण मार्केट, होळी, तामतलाव, पापडी, माणिकपूर, अंबाडी रोड, येथील मासळी बाजार आज कडकडीत बंद आहेत. कोळी महिला मासळी विक्रीकारिता घराबाहेर पडल्या नाहीत.

वसई मच्छीमार संस्थेच्या आवारात रात्री 11 वाजता आणि सकाळी 6.00 वाजता भरणारे मासळी बाजार आज बंद ठेवण्यात आले

मुंबई ते तलसारी झाईपर्यंत बंद

केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदर विरोधात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीद्वारे बंदची हाक देण्यात आली होती. मुंबईतील कफ परेड ते डहाणू तलासरी झाईपर्यंत कोळीवाडे आणि गावांमध्ये बंद पाळण्यात आला. या बंदला अनेक मच्छीमार संघटना तसेच रिक्षाचालक-मालक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज कडकडीत बंद पाळण्यात आला. किनारपट्टी वरील बाजारपेठा , मच्छीबाजार बंद ठेवण्यात आले होते. 

भाजप खासदार कपिल पाटील यांची भूमिका

वाढवण बंदराला लोकांचा विरोध असेल आणि जनभावना प्रकल्पाच्या विरोधात असतील तर या जन भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचवणार असल्याचे कपिल पाटलांनी सोमवारी (14 डिसेंबर) सांगितले. केंद्र सरकारला वाढवण बंदराबाबत विचार करण्यासाठी सांगू,अशी प्रतिक्रिया खासदार कपिल पाटिल यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.