सुशांत सिंह राजपूतची हत्या की आत्महत्या? CBIनं स्पष्ट करावं' : अनिल देशमुख

0 झुंजार झेप न्युज

सुशांत सिंह केसवरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी सीबीआयवर निशाणा साधलाय. या प्रकरणी सीबीआयने लवकरात लवकर खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

 नागपूर: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या की हत्या हे सीबीआयनं स्पष्ट करावं असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय. नागपूर येथे एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलंय.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, "सुशांत सिंह केसमध्ये सीबीआयला तपास देऊन चार ते पाच महिने झाले. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे लोकांना जाणून घ्यायचं आहे. सीबीआयनं लवकरात लवकर या केसच्या बाबतीतला तपासाचा अहवाल जनतेसमोर ठेवावा. राज्याचा गृहमंत्री म्हणून मला सतत लोक हेच विचारतात."

अनिल देशमुखांनी या प्रकरणी सीबीआयवर निशाणा साधत पुढं म्हटलं की, "महाराष्ट्रातले लोक तसेच महाराष्ट्राबाहेरचे लोक अतिशय उत्सुकतेनं सीबीआयच्या या तपासाची वाट बघताहेत की कधी एकदा सीबीआयचा तपास समोर येतो. त्यामुळं ही आत्महत्या होती की त्याची हत्या करण्यात आली याबद्दलचं सत्य जनतेसमोर येईल. आज गृहमंत्री म्हणून लोक मला सातत्यानं विचारतात की या केसचं काय झालं. त्यामुळं सीबीआयनं याचा लवकरात लवकर खुलासा करावा."

नागपूरात 15 टक्क्यांनी गुन्हे कमी

नागपूर हे गृहमंत्र्याचं शहर असूनदेखील या शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हे घडतात असा नेहमी आरोप केला जातोय. आता या शहरात गुन्ह्यांची संख्या कमी झाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. अनिल देशमुख म्हणाले की, "नागपूरमध्ये गेल्या काही वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांनी गुन्ह्यांमध्ये कमी आली आहे." क्राईम कॅपिटल अशी असणारी नागपूरची ओळख आता पुसून काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.