मसाला किंग आणि MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन
एमडीएचचे मालक आणि मसाला किंग म्हणून प्रसिद्ध असेलल्या महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं. मसाल्याचे दुकानदार ते उद्योजक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता.
नवी दिल्ली : देशातील मसाल्याची कंपनी 'महाशिया दी हट्टी' अर्थात एमडीएचचे मालक आणि मसाला किंग म्हणून प्रसिद्ध असेलल्या महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं. आज (3 डिसेंबर) सकाळी पाच वाजून 38 मिनिटांनी वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गुलाटी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरेही झाले होते. परंतु आज सकाळी दिल्लीच्या माता चंदन देवी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
भारत सरकारने त्यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषणने सन्मान केला आहे.
धर्मपाल गुलाटी हे जाहिरात विश्वातील सर्वात वयोवृद्ध स्टार आणि 'महाशियां दी हट्टी' (एमडीएच) चे मालक होते. मसाल्याचे दुकानदार ते उद्योजक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. ते 2000 कोटी रुपयांच्या बिजनेस ग्रुपचे मालक होते.
धर्मपाल गुलाटी एफएमसीजी (फास्ट मूविंग कन्झ्युमर गुड्स) क्षेत्रात सर्वात कमाई करणारे सीईओ होते. मागील वर्षी प्रजासत्ताक दिनी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
धर्मपाल गुलाटी एफएमसीजी (फास्ट मूविंग कन्झ्युमर गुड्स) क्षेत्रात सर्वात कमाई करणारे सीईओ होते. मागील वर्षी प्रजासत्ताक दिनी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

