27 जानेवारीला बेळगाव सीमाप्रश्नी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची महत्त्वाची बैठक

0 झुंजार झेप न्युज

कर्नाटकात भाजपचे सरकार असल्यामुळे आता भाजप सीमाप्रश्नावर काय भूमिका घेणार, हे आता पाहावे

मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर (Maharashtra Karnataka border issue) तोडगा काढण्यासाठी महाविकासआघाडी सरकारकडून लवकरच काहीतरी मोठ्या हालचाली होण्याचे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात 27 जानेवारीला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला महाविकासआघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ हे नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनीही या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे.

मात्र, कर्नाटकात भाजपचे सरकार असल्यामुळे आता भाजप सीमाप्रश्नावर काय भूमिका घेणार, हे आता पाहावे लागेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या बैठकीला उपस्थित राहतात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

बेळगावात भगवा फडकवण्यावर शिवसैनिक ठाम, सीमेवर कर्नाटक पोलिसांसोबत झटापट

बेळगावातील हुतात्मा दिनापासून सीमाप्रश्नावरुन राजकीय वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हुतात्मा दिनी बेळगावात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कर्नाटक पोलिसांनी त्यांना कोगनेळी टोलनाक्यावर रोखले होते.

त्यानंतर शिवसैनिकांनी बेळगावात कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकावण्याचा निर्धार केला होता. सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटावावा, अशी मागणी या शिवसैनिकांनी केली होती. त्यासाठी गुरुवारी शिवसैनिक महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिनोळी गावात पोहोचले होते.

यावेळी कर्नाटक पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली होती. तेव्हापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणावाचे वातावरण आहे. आता शिवसैनिकांनी गनिमी काव्याने बेळगावात शिरण्याचा चंग बांधला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.