शस्त्र घेऊन फिरणाऱ्या 33 जणांना अटक, हॉटेल, लॉजवर धाडी; मुंबई पोलिसांचं ‘ऑल आऊट’ ऑपरेशन

0 झुंजार झेप न्युज

 प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात 24 तासांचं ऑल आऊट ऑपरेशनचं आयोजन केलं होतं.

मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात 24 तासांचं ऑल आऊट ऑपरेशनचं आयोजन केलं होतं. यावेळी पोलिसांनी बेकायदेशीरपणे शस्त्र घेऊन फिरणाऱ्या 33 जणांच्या मुसक्या बांधल्या असून त्यांच्याकडून शस्त्रे ताब्यात घेतली आहेत. तर 52 फरार आरोपींनाही जेरबंद केलं आहे.

प्रजासत्ताक दिन दोन दिवसांवर आला आहे. या अनुषंगाने गेल्या 24 तासांसाठी ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आलं आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिग, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन राबवण्यात आलं. हे ऑपरेशन ऑल आऊट यशस्वी होण्यासाठी अख्खं पोलीस दल सक्रिय झालं होतं. या ऑपरेशन अंतर्गत मुंबईत 223 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यात रेकॉर्डवरील 1369 गुंडांची चौकशी करण्यात आली. यावेळी पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असलेल्या 52 आरोपीना अटक करण्यात आली.

पोलिसांची नाकाबंदी

या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मोबाईल चोरून पळून जाणाऱ्या दोन चोरांना देखील अटक करण्यात आली. तर 66 जणांना एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली. या शिवाय शहरात 101 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी 8579 गाड्या तपासण्यात आल्या. एमव्ही कायद्यानुसार 2479 ड्रायव्हरवर कारवाईही करण्यात आली. तर 12 चालकांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करण्यात आली.

हॉटेल, लॉजची झाडाझडती

या ऑपरेशन अंतर्गत पोलिसांनी 739 हॉटेल्स आणि लॉजवर धाडी मारून या ठिकाणची झाडाझडती करण्यात आली. यावेळी पोलिसांना 31 ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी तात्काळ हे धंदे बंद केले. तसेच हे बेकायदेशीर धंदे करणाऱ्या 40 जणांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर तडीपार असतानाही शहरात वावरणाऱ्या 31 जणांच्या मुसक्याही पोलिसांनी आवळल्या. शिवाय अजामीनपात्र वॉरंट असलेल्या 59 जणांनाही अटक करण्यात आली. तसेच 130 फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.