‘सगळ्यांच्या मनातून कोरोनाची भीती जात नाही तोपर्यंत महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईनच’

0 झुंजार झेप न्युज

ध्या महाविद्यालये कधी सुरु होणार, असा प्रश्न सगळ्यांकडून विचारला जात आहे.

पुणे: सगळ्यांच्या मनातून कोरोनाची भीती जाऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्याची मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत महाविद्यालयीन परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच पार पडतील, असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले. सध्या महाविद्यालये कधी सुरु होणार, असा प्रश्न सगळ्यांकडून विचारला जात आहे. विद्यापीठांशी चर्चा करुन यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी तुर्तास तरी महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होतील, हे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्यासाठी कोरोनाची साथ पूर्णपणे जाण्याची वाट पाहावी लागेल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले उदय सामंत?

एखाद्या घटकाला आरक्षण देताना दुसऱ्या समाजाचे आरक्षण काढून घेतले जाणार नाही, हीच महाविकासआघाडीची भूमिका आहे. विजय वडेट्टीवार हे सातत्याने ओबीसी समाजाची भूमिका मांडत आहेत. मात्र, त्यावरुन मंत्रिमंडळात कोणताही वाद नाही, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

शेतकरी आंदोलनाला महाविकासआघाडीचा पाठिंबा

महाविकासआघाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेली नाही. तरीही आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. मी आज पुण्यातील काही शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

‘सुशीलकुमार शिंदे राष्ट्रीय नेते, मी बोलणं योग्य ठरणार नाही’

शिवसेनेने काँग्रससोबत येण्यास उशीर केला. उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडी सरकारमध्ये येऊन खरे हिंदुत्व दाखवले, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच केले होते. त्यावर उदय सामंत यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा उदय सामंत यांनी म्हटले की, सुशीलकुमार शिंदे हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या विधानावर मी बोलणे योग्य नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

दहावी आणि बारावीची परीक्षा मे महिन्यात

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काही दिवसांपूर्वीच दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीत तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे या कालावधीत पार पडेल. कोरोनाच्यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी बाळगून या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.