भाई ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीचं धाडसत्र, 5 ठिकाणी धाडी

0 झुंजार झेप न्युज

भाई ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीचं आज सकाळपासून धाडसत्र सुरु आहे.

विरार : भाई ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर आज सकाळपासून (शुक्रवार ता.22 जाने.) ईडीचं धाडसत्र सुरु आहे. ईडीने विवाशी संबंधित पाच ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. आज सकाळपासून विरारमध्ये ईडीच्या धाडी सुरु आहेत. मनीलॉन्ड्रिंगच्या संबंधातून या सगळ्या धाडी टाकल्या जात आहेत.

विरारमध्ये विवा तसंच तिच्याशी संबंधित संस्थावर ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत. 5 ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आलेल्या आहेत. विवा संस्थेशी संबंधित या पाचही धाडी पडलेल्या आहेत.

भारतभर गाजलेल्या पीएमसी घोटाळ्यात 5 ते 6 हजार कोटींचं मनीलॉन्ड्रिंग झालं होतं. यातले काही पैसे विवाशी संबंधित संस्थेमध्ये गुंतवण्यात आले होते. हा सगळा मनी ट्रेल ईडीच्या अधिकाऱ्यांनी शोधला होता. याच पार्श्वभूमीवर आता ही कारवाई सुरु झाली आहे.

आज सकाळपासून ईडीने विवाशी संबंधित कार्यालयांवर तसंच विवाच्या मालकाच्या घरावर धाड टाकली आहे. काही महत्त्वाची कादगत्रे ईडीच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. आणखीही कारवाई सुरु आहे. कारलाई संपल्यानंतर तपासासंबंधी काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्याची शक्यता आहे.

ईडीच्या धाडी कुठेकुठे…?

विरारमधील विवा संस्थेच्या मालकाच्या घरावर पहिली धाड,

विवाशी संबंधित दोन कार्यालयांवर धाड,

तसंच संस्थेच्या संबंधित इतर दोन ठिकाणी ईडीच्या धाडी

पहिल्यांदा विवा संस्थेच्या मालकांच्या घरी धाड टाकण्यात आली. त्याशिवाय त्यांच्या चार कार्यालयांवर ई़डीची धाड

ईडीचं नेमकं काम काय…?

ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालय… 1947 च्या कायद्याअंतर्गत ईडीची स्थापना झाली. 1956 ला स्थापनेच्या वेळी ईडीला एनफोर्समेंट यूनिट म्हणून ओळखलं जायचं. पण 1957 ला त्याचं नाव बदलून ईडी (एनफोर्समेंट डायरेक्टरेट) असं करण्यात आलं. ही एक इकोनॉमिक्स इंटेलिजन्स एजन्सी आहे. देशातील हवाला, मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींवर ईडी नजर ठेवते…

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.