ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे.
,सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या खेळावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसी सकाळच्या सत्रात आतापर्यंत 3 गड्यांच्या बदल्यात 217 धावा उभारल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथ 76 धावांवर खेळत आहे. तर मार्नस लाबुशेन काही वेळापूर्वी 91 धावांवर बाद झाला आहे. टीम इंडियाकडून काल मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. आज सकाळच्या सत्रात फिरकीपटू रवींद्र जडेजाने लाबूशेनला कर्णधार अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद करुन आजच्या दिवसातलं पहिलं यश मिळवून दिलं.
अशी आहे टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी

