एकच ध्यास वॉर्डाचा विकास -: सौ.अर्चनाताई गवारे
मान :सौ अर्चनाताई गवारे ग्रामपंचायत निवडणूक वार्ड क्रमांक 1 मधून लोकप्रिय उमेदवार सौ अर्चनाताई रामेश्वर गवारे ही निवडणूक लढवत आहेत. त्यांचे निवडणूक चिन्ह फलंदाज आहे .तरुण सुशिक्षित व मनमिळावू सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणून अर्चना ताई गवारे यांच्याकडे पाहिले जाते .त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे .कुटिरोद्योग असेल लघुउद्योग , टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे असे उपक्रम राबवून ,महिलांना रोजगार देऊन महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न अर्चनाताई गवारी यांनी केला आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक 1 मधून अर्चनाताई गवारे यांना वाढता पाठिंबा मिळत आहे .माण गावाचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ पॅनेलच्या माध्यमातून त्या निवडणूक लढवत आहेत .वार्डातील मूलभूत सुविधा मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले .त्यामध्ये गावातील रस्त्याचा प्रश्न असेल , लाईटचा , पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,ड्रेनेज लाईन शाळा व आरोग्यसेवा यावर विशेष भर देणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले .त्यांच्या पॅनलचा प्रचाराचा नारळ धुमधडाक्यात सर्व ग्रामस्थांच्या वतीने व गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने धुमधडाक्यात फोडण्यात आला .या प्रचार शुभारंभ मध्ये गावातील महिला व ज्येष्ठ तरुण नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला .तरी सुजाण नागरिक मतदार बंधू-भगिनींना फलंदाज या चिन्हा समोरील बटन दाबून मला मतदान रुपी आशीर्वाद देऊन , प्रचंड मताने विजयी करून समाज सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करते.जय हिंद जय महाराष्ट्र

