भाजपला आणखी एक झटका?, पुण्यातील माजी आमदार राष्ट्रवादीत जाणार; अजितदादांशी खलबतं!

0 झुंजार झेप न्युज

पुण्यातील भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश देण्याची चर्चा रंगलेली असतानाच आता भाजपच्या एका बड्या आमदाराला प्रवेश देऊन भाजपला कात्रजचा घाट दाखवण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे.

पुणे: पुण्यातील भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश देण्याची चर्चा रंगलेली असतानाच आता भाजपच्या एका बड्या आमदाराला प्रवेश देऊन भाजपला कात्रजचा घाट दाखवण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. भाजपच्या या बड्या माजी आमदाराने राष्ट्रवादीत घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नेत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी पक्षप्रवेशाबाबत खलबतं केल्याची माहिती आहे. त्यामुळे हा भाजपचा माजी आमदार कोण? याबाबत पुण्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

भाजपच्या या माजी आमदाराने ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपमध्ये जाऊन फारसा फायदा झाला नसल्याचं जाणवल्याने त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईत अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र, अजित पवारांनी या माजी आमदाराला पक्षात प्रवेश द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांकडे सोपवला आहे. या माजी आमदाराने पक्षात प्रवेश केल्यास त्याचा राष्ट्रवादीला मोठा फायदा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, हा माजी आमदार कधी आणि केव्हा पक्षात प्रवेश करणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. तसेच या माजी आमदाराचे नावही गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने हा आमदार कोण? याबद्दल पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

पालिकेची जय्यत तयारी

या आधी भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली होती. ही चर्चा थांबते न् थांबते तोच आता ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदाराला पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला अस्मान दाखवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.